कृषी व व्यापारताज्या घडामोडी

मासे खरेदी संबधित महत्वाच्या टिप्स:

निर्भय न्यूज लाईव्ह

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

 

 

ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी…..!!!

———————————————-

मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स :

 

कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत.

मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत.

 

पापलेट : 🐟

—————-

रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात.

पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.

 

भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा : 🐠

———————————————-

विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे.

माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब समजावेत.

 

• कोलंबी : 🍤

—————

कोलंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते.

 

•लाल कोलंबी : लाल कोलंबी मध्ये काळसर लाल व पांढर्या हिरवट रंगाची

लाल कोलंबी ताजी असते. हि कोलंबी रंगाने ऑरेंज कलरची होऊ लागली कि ती शिळी व खराब झाली असे समजावे.

तसेच शिळ्या व खराब कोलंबीची डोकी तुटलेली असतात.

ताजी कोलंबी घट्ट व कडक सालीची असते.

शिळ्या व खराब कोलंबीचे साल मऊ पडलेले असते व घाण वास येतो.

 

•पांढरी कोलंबी : पांढरी कोलंबी पचायला हलकी व जास्त चांगली असते.

पांढरी कोलंबी हि पांढर्या स्वच्छ रंगाची, घट्ट व चमकदार असते.

पांढर्या कोलंबीत जर पिवळसर काळा रंग येऊ लागला

तर ती शिळी व खराब होत आली आहे असे समजावे.

तसेच कोलंबीची डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली

व साल मऊ पडलेली कोलंबी शिळी व खराब झालेली असते. ती घेऊ नये.

 

• करंदी :

————-

तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते.

 

• बांगडे : 🦦

———–

काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात.

तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात.

बांगडे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ पडतात दाबल्यास खड्डा पडतो.

 

• बोंबील :

————–

ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार दिसतात.त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो.

बोंबील खराब होत आले कि त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.

 

• मुडदुशा (रेणवे) :

—————————

पांढऱ्या स्वच्छ व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा ताज्या असतात.

त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो.

मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात.

 

• मांदेली :

————-

पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली

मांदेली ताजी असतात.मांदेली शिळी व खराब होऊ लागली कि तिला ऑरेंज रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात.

 

• बोय :

———–

काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते.जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो.

 

• शेवंड (Lobster ), खाडीची मोठी कोलंबी :

——————————————————–

शेवंड व खाडीची मोठी कोलंबी विकत घेताना

घट्ट, कडक सालीची बघून व ताजी बघून घ्यावी.

 

ओला जवळा : 🦐

———————–

ओला जवळा घेताना पांढऱ्या स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा.

 

शिंपल्या (तिसर्या) : 🐚

—————————–

शिपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात, किंवा जिवंत असणाऱ्या, तोंडे उघडझाप करणाऱ्या घ्याव्यात.

शिपल्या खराब व शिळ्या झाल्या कि त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात मिटत नाहीत.

 

• कालवे :

————–

कालवे घेताना पाढर्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत.

छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात.

 

चिंबोरी (खेकडे/ Crab) : 🦀

———————————–

चिंबोऱ्या घेताना काळसर रंगाच्या, जिवंत व चालणार्या बघून घ्याव्यात.

खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खायाला काही मिळत नाही

तसेच अमावास्येला खेकडे मांसाने भरलेले असतात

व पौर्णिमेला आतून पोकळ असतात असे म्हणतात.

या अमुल्य माहितीची पुरेपुर आनंद घ्यावा…!

तुमच्या ही काही टिप्स असतील तर त्या ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये