जांबुत येथील दूध डेअरी मधील मशीन चोरी करणाऱ्या आरोपीस शिरूर पोलीस स्टेशन शोध पथकाने केले जेरबंद
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी

दुग्ध व्यवसायिकाच्या डेअरी मधील मशीन चोरी करणारे आरोपीस शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद
काही दिवसांपूर्वी जांबुत परिसरातील दूध डेअरीचे कुलूप तोडून डेअरी मधील मिल्क कुलर मशीन व जनरेटर चोरट्यांनी चोरी करून नेले होते. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरट्यांना केली अटक .
सदर घडलेली घटना खालीलप्रमाणे २२/१०/२०२४ रोजी सायंकाळी ३ वाजता ते दिनांक २६/१०/२४ रोजी १०:३० वाजेच्या दरम्यान मौजे रा .जांबूत ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत तानाजी जगताप यांच्या गाळ्यामधुन फिर्यादी श्री अभिजीत भाऊ कोल्हे वय २५ वर्षे व्यवसाय दुग्ध व्यवसाय,रा.चोभुंत ता. पारनेर जि.अहमदनगर यांनी दुग्ध व्यवसायिका करिता आणलेले महिंद्रा कंपनीचे जनरेटर व बल्क मिल्क कुलर युनिट किंमत ८,७४,२६२ /- रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायदा करिता बंद दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून अज्ञात वाहनाच्या साहाय्याने चोरून नेले होते . फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार शिरूर पोलीस 1स्टेशन गु. रजि.नंबर.९०८/२०२४ , भारतीय न्याय सहिता ३०५(ए)३११(३) (४)प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचा तपास शिरूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना जांभुत, फाकटे, कवठे यमाई, मलठण, कानहुर मेसाई या गावांमधील सुमारे ५० पेक्षा अधिक सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा आरोपी एकनाथ नारायण फलके रा. जांबुत, फलके वस्ती ता. शिरूर, जि. पुणे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस होण्याची चौकशी करणे ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने रात्रीचे वेळी सदरची घरपोडी करून चोरी दिलेली महिंद्रा कंपनीचे जनरेटर व बल्क मिल्क कुलर युनिट किंमत ८,७४,२६२ रुपये हे गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक सो श्री पंकज देशमुख सो मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री प्रशांत ढोले सो, मा. पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकामधील सहा. पोलीस निरीक्षक श्री हनुमंतराव गिरी, पोलिस अमलदार नीरज पिसाळ, विजय शिंदे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात, निखिल रावडे, यांचे पोलीस पथकाने केली आहे.