महाराष्ट्र शासन ‘१०० दिवस’ उपक्रम अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, कामगार सुरक्षितता, वाहतूक या विषयावर रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडून एम.आय.डी.सी.तील व्यवस्थापक आणि मॅनेजर बरोबर मीटिंग आणि चर्चा
निर्भय न्यूज लाईव्ह: कारेगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन ‘१०० दिवस’ उपक्रम अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था, कामगार सुरक्षितता, वाहतूक या विषयावर रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडून एम.आय.डी.सी.तील व्यवस्थापक आणि मॅनेजर बरोबर मीटिंग आणि चर्चा
रांजणगाव पोलीस यांच्याकडून महाराष्ट्र १०० दिवस अंतर्गत रांजणगाव एम.आय.डी.सी. कंपन्या व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राहावा,कायदा आणि सुव्यवस्थेसाठी १० महत्त्वाच्या मुद्द्यावर मीटिंग घेण्यात आली होती.
रांजणगाव पोलिसांकडून शासनाच्या ‘१०० दिवस ‘ या उपक्रमाच्या अंतर्गत महत्त्वाचे उपक्रम .
रांजणगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कंपनी व्यवस्थापक आणि मॅनेजर यांची ‘रिया मीटिंग हॉल’ कारेगाव,ता. शिरूर जि. पुणे येथे मीटिंग घेण्यात आली होती. रांजणगाव एम.आय.डी.सी मधील कंपन्या व प्रशासन यामध्ये समन्वय राहावा कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने विविध विषयावर विचार ,विनिमय या बैठकीत करण्यात आला.
•रांजणगाव पोलीस स्टेशन आयोजित मीटिंगमध्ये महत्त्वाचे १० मुद्दे खालील प्रमाणे•
१)कंपनीमध्ये महिला कामगार यांची वाढती संख्या लक्षात घेता सुरक्षिततेसाठी कंपन्यांतर्गत ‘पॉश कमिटी’ नेमणे बाबत विचार विनिमय करण्यात आला.
२)वाढत्या सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने कंपनी अंतर्गत येणारे सर्व कामगार यांच्यात जनजागृती करण्याबाबत कार्यक्रम आयोजित करणे.
३)कंपनीत कोणी ब्लॅकमेल करून खंडणी अथवा कामाची मागणी करीत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार करणे.
४)कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराची चरित्र पडताळणी तपासणे करून घेऊन सर्व कामगारांची माहिती पोलीस स्टेशन येथे कळविणे.
५)कारेगाव, ढोक सांगवी, रांजणगाव गणपती या गावा मध्ये राहत असलेले कामगार, भाडेकरू यांची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशन येथे कळविणे.
६) कंपनीमध्ये बालकामगार काम करणार नाही याची काळजी घेणे.
७) रांजणगाव एम.आय.डी.सी अंतर्गत महिला स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढाकार घेऊन त्वरित अंमलबजावणी करणे.
८) वाहतूक समस्या वाढत असल्याने कंपनी व्यवस्थापक व रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन(रिया) यांच्याकडून वार्डन उपलब्ध करणे.
९) आय.टी.आय कॉलेज रोडवरील आठवडा बाजारामुळे कंपनीच्या कामास अडथळा येत असल्या कारणामुळे बाजार इतरत्र हलवण्याकरता जागा उपलब्ध होणार असल्या कारणामुळे त्याबाबत संबंधित विभागाला पत्र व्यवहार करून पाठपुरवठा करणे.
१०) पोलीस मदतीसाठी डायल ११२ प्रभावी वापर करणे.
वरील विषयावर चर्चा होऊन, रिया हॉल, कारेगाव येथील मीटिंगमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी व कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगार सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक या विषयावर चर्चा होऊन विविध उपयोजना करण्याबाबत ठरले. सदर मीटिंग करिता श्री प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर विभाग. श्री महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, रांजणगाव गणपती,एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन. उप अभियंता श्री अशोक चव्हाण, साहेब. श्री. ब्रह्मा पवार, श्री.बिबे, ग्रामसेवक, कारेगाव. श्री बी एन शुक्ला, रिया व्हाईस चेअरमन. श्री नितीन पाठक,बोर्ड सदस्य. श्री. कोहकडे.जिवोदण कंपनी,व इतर ५० ते ६० कंपनीचे प्रतिनिधी यावेळेस हजर होते.
यावेळी वरील १० मुद्द्यावर मीटिंग मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता , वाहतूक, कामगार सुरक्षा या विविध विषयावर चर्चा झाली.