क्राईम न्युज
Trending

शिरूरमध्ये मध्यरात्री हाणामारी: हॉटेलमध्ये तोडफोड, सोसायटीत कोयत्याने हल्ला!

निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूरमध्ये मध्यरात्री हाणामारी: हॉटेलमध्ये तोडफोड, सोसायटीत कोयत्याने हल्ला..!!

शिरूर (पुणे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटना १: हॉटेलमध्ये घुसून तोडफोड आणि मारहाण

पहिला प्रकार शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील श्रीनिवास नगर येथे असलेल्या फिर्यादी प्रशांत गोवर्धन साबळे यांच्या मालकीच्या पी.आर. हॉटेलमध्ये घडला. गुरुवारी (दि. २५) मध्यरात्री सुमारे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मिथुन सिंग, जितू सिंग, रेखा सिंग, योगेश अडसूळ, सनी अमल नेरी, संदीप खोले, साईनाथ कुलकर्णी, शाहरुख खान आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला.

या जमावाने हॉटेलमध्ये येऊन प्रशांत साबळे यांच्या भावाला, ऋषिकेशला शोधण्यास सुरुवात केली. “ऋषिकेशला लय माज आला आहे, आज त्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्यांनी आरडाओरडा केला. फिर्यादी प्रशांत आणि त्यांचा भाऊ ऋषिकेश घाबरून हॉटेलबाहेर पळून गेले.

दरम्यान, हॉटेलमधील कामगार निरज बिस्ट हा किचनमध्ये काम करत असताना आरोपी मिथुन सिंग याने त्याच्या हातातील तलवारीच्या उलट्या बाजूने त्याच्या डाव्या खांद्यावर मारले. संदीप खोले याने लाकडी काठीने त्याच्या पाठीवर आणि हातावर मारहाण केली. इतर आरोपींनी फिर्यादी प्रशांत, त्यांचा भाऊ ऋषिकेश आणि कामगार निरज यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच, हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), ३२४(४), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह आर्म अॅक्ट कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साबळे करत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार उबाळे यांनी काम पाहिले असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

घटना २: सोसायटीच्या गेटवर कोयत्याने हल्ला आणि मारहाण

दुसरा प्रकार रामलिंग रोडवरील जय हनुमान सोसायटी येथे घडला. फिर्यादी रेखा विजय पाल सिंग (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आणि अर्चना अडसूळ जेवणानंतर सोसायटीच्या मेनगेटजवळ फिरत होत्या. त्यावेळी सोसायटीच्या बाकड्यावर अखिल शेख, योगेश अडसूळ, मिथुन सिंग बसलेले होते.

दरम्यान, ऋषिकेश गोवर्धन साबळे (रा. घोटीमळा) हा दारूच्या नशेत तेथे आला आणि त्याने पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून योगेश अडसूळला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने योगेशचा मुलगा मिथुन याला खाली पाडून त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने मारण्यासाठी धावला. फिर्यादी रेखा सिंग मध्ये पडल्या असता, कोयता त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ लागून त्या जखमी झाल्या.

आरोपी ऋषिकेशने फिर्यादीचा मुलगा जितेंद्र सिंग याला लोखंडी रॉडने दोन्ही हात आणि दोन्ही पायांवर मारहाण केली. तसेच, मिथुनच्या डाव्या आणि उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. योगेश अडसूळ यालाही लोखंडी रॉडने दोन्ही पाय, मांडी, मान आणि डोक्यात मारहाण करून दुखापत केली. फिर्यादी रेखा सिंग यांचे केस धरून खाली पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली, असे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), ३(५) सह आर्म अॅक्ट कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करत आहेत. दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार उबाळे यांनी काम पाहिले असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचाही तपास सुरू आहे.

एकाच रात्री दोन गंभीर गुन्हे घडल्याने शिरूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दोन्ही प्रकरणांचा कसून तपास करत असून आरोपींना लवकरच अटक करतील, अशी माहिती मिळत आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये