
१९८ शिरूर विधानसभा निडणुकीसाठी खर्च निरीक्षकाची नियुक्ती
शिरूर प्रतिनिधी – दिं-२३/१०/२४
पुणे जिल्ह्यातील १९८ शिरूर विधानसभा मतदासंघांच्या दिनांक -२०/११/२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारत निवडनुक आयोगाकडून खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
निवडणूक खर्च म्हणून डॉ. ए. व्यंकटेश बाबू(IRS) यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा निवासाचा पत्ता – व्हीआयपी विश्राम गृह, पुणे येथील कक्ष क्रमांक – ए १०६ असा आहे.त्यांचा स्थानिक संपर्क क्रमांक – ९२२६१८४५५४ असा आहे.तसेच निवडणुक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी श्री हरीश बोरवके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक – ९७०२४१३०१८ असा आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक व्हीआयपी विश्राम गृह, पुणे यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते ११ वाजे पर्यंत आहे.असे १९८ विधानसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. संगीता राजापूरकर यांनी कळविले आहे.