ग्रामीण वार्ता
Trending

भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचे मोठे नुकसान; चालकाविरोधात गुन्हा दाखल

नियमांचे उल्लंघन करत टिप्परने दुचाकीला उडवले; चालकाचा निष्काळजीपणा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूर (पुणे): मलठण-सोनेसांगवी रोडवर एका भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याचा मित्र सुदैवाने बचावले असले तरी, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नियमांचे उल्लंघन करत टिप्परने दुचाकीला उडवले; चालकाचा निष्काळजीपना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणव चंद्रकांत गाढवे (वय २१, रा. संविदने, ता. शिरूर) हे त्यांचे मित्र प्रशांत विजय पवार यांच्यासोबत ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून मलठणहून सोनेसांगवी-रांजणगाव रोडने रांजणगावकडे कामासाठी जात होते. मलठण गावातील दंडवते वस्तीजवळ असताना समोरून रांजणगाव बाजूकडून एम.एच. १२ डब्ल्यू. जे. ६१६८ क्रमांकाचा आयशर कंपनीचा टिप्पर वेगात आला.

टिप्पर चालकाने रस्त्याच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अचानकपणे गाढवे यांच्या दुचाकीच्या समोर आपले वाहन आणले. यामुळे गाढवे यांच्या दुचाकीची टिप्परला धडक बसली आणि मोठा अपघात झाला. या अपघातात प्रणव गाढवे आणि त्यांचे मित्र खाली पडले, परंतु त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या हिरो कंपनीच्या एम.एच. १२ व्ही. यू. २४७९ क्रमांकाच्या दुचाकीच्या पुढील चाकाचे मॅकव्हील आणि इतर भागांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळी न थांबता वेगाने केशर पॉईंटच्या दिशेने निघून गेला. गाढवे आणि त्यांच्या मित्रांनी त्याचा पाठलाग केला, परंतु चालकाने त्याचे वाहन तिथेच सोडून पळ काढला. त्यानंतर गाढवे यांनी टिप्पर मालक राहुल खरपुडे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली आणि चालकाविषयी विचारणा केली. खरपुडे यांनी दादाभाऊ डांगे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) हा त्यांच्या टिप्परवर चालक म्हणून काम करत असल्याचे सांगितले.

या घटनेनंतर प्रणव गाढवे यांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन नुकसान करणाऱ्या टिप्पर चालक दादाभाऊ डांगे यांच्याविरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार गर्कळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये