शिरूरमध्ये १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल
१८ वर्षीय तरुणी बेपत्ता; शिरूर पोलीस तपास करत आहेत.

शिरूर: शिरूर शहरातील सिटी बोरा कॉलेज परिसरातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.(नाव गुप्तता ) सदर तरुणी, ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बेपत्ता आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
* (नाव गुप्तता) वडील तांबोळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
* (नाव गुप्तता )कॉलेजला पेपरसाठी सोडल्यानंतर ती घरी परतली नाही.
* (नाव गुप्तता) शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
तरुणीचा तपशील:
* नाव: गुप्तता
* वय: १८ वर्षे
* राहणार: महादेव नगर, शिरूर, जि. पुणे
* उंची: ५ फूट
* रंग: गोरा
* चेहरा: जाड
* केस: लांब आणि काळे
* डोळे: काळे
* नाक: सरळ
* कपडे: काळ्या रंगाचा बुरखा, कॉफी रंगाची सँडल
* भाषा: हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू
* फोन: वापरत नाही
पोलिसांचे आवाहन:
तरुणी बाबत कोणालाही माहिती मिळाल्यास कृपया शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क:
* शिरूर पोलीस स्टेशन: ०२०-२७२९१०००
तपास:
* सहाय्यक फौजदार साबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
* प्रभारी अधिकारी: पो. नि. श्री. संदेश केंजळे सो