रांजणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला; आरोपीला अटक
निर्भय न्यूज लाईव्ह: रांजणगाव प्रतिनिधी

रांजणगाव (पुणे): रांजणगाव पोलिसांनी 31 मार्च 2025 रोजी कारेगाव येथे मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेखर भगवान अभंग (वय 25) याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एक व्यक्ती टाटा पंच कारमधून प्रतिबंधित गुटखा घेऊन जात आहे. त्यानुसार पोलिसांनी कारेगाव येथील यश इन चौकात सापळा रचला. पोलिसांना एक टाटा पंच कार संशयास्पद स्थितीत आढळून आली. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता, कारचालक पळून गेला . मात्र, गुन्ह्याचा तपास करताना यातील आरोपी शेखर भगवान अभंग वय २५ वर्ष, रा.मंगलमूर्ती शाळेजवळ ,रांजणगाव हाच असल्याचा निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरोधात करवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

* आरएमडी पान मसाला: 3600 रुपये (4 लहान बॉक्स)
* केसरयुक्त गोवा 1000: 00.00 रुपये (10 पाकिटे)
* विमल पान मसाला: 2400 रुपये (20 पाकिटे)
* सम्राट पान मसाला: 3000 रुपये (25 पाकिटे)
* टाटा पंच कार: 9,00,000 रुपये
* एकूण: 9,09,000 रुपये
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल:
पोलिसांनी आरोपी शेखर अभंग याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 223, अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26(2)(i)1, कलम 26/2(iv), 27(3),(d)27(3)(e) सहवाचन कलम 3(i),(zz), 30(2)(a) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपासाबाबत माहिती:
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे करत आहेत.
पोलिसांचे आवाहन:
महाराष्ट्र राज्यात गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट तंबाखू सुपारी यांच्या उत्पादनावर, साठवणुकीवर, वितरणावर, वाहतुकीवर आणि विक्रीवर बंदी आहे. नागरिकांनी अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा वाहतूक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.