काही वर्षांपूर्वी,भारतात,हो चक्क भारतात घडली होती अशी एक घटना,की त्यावेळी संपूर्ण पोलीस स्टेशन निलंबित करण्यात आलं होतं..!!!वाचा सविस्तर…..!
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

काही वर्षांपूर्वी,भारतात,हो चक्क भारतात घडली होती अशी एक घटना,की त्यावेळी संपूर्ण पोलीस स्टेशन निलंबित करण्यात आलं होतं..!!!वाचा सविस्तर…..!!
( काल्पनिक AI फोटो साभार)
तुम्ही जर कधीकाळी ‘चांदोबा’ मासिक वाचले असेल तर तुम्हाला आठवत असेल की त्यात बऱ्याचदा ‘राजा भोज’ ची एखादी कथा असायची? काय असायची ती गोष्ट?
त्या कथेतला राजा भोज बऱ्याचदा एखाद्या सामान्य नागरिकाचा वेष परिधान करून जनतेच्या अडीअडचणींचा, सरकारी अधिकाऱ्यांकडून जनतेला होणाऱ्या त्रासाचा आढावा घेत असे आणि मग दुसऱ्या दिवशी दरबारात त्या तक्रारींचे निवारण करत असे.
खरं खोटं देव जाणे!
पण या कलियुगात देखील अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी, भारतात, हो चक्क भारतात घडली!
१९७९ मध्ये उत्तरप्रदेश मधील इटावा जिल्ह्यातील उसराहर पोलीस स्टेशनमध्ये एक मळकट धोतर नेसलेला गरीब माणूस गेला आणि त्याने आपल्या बैलाच्या चोरीबद्दल तक्रार लिहायला सांगितली. इन्स्पेक्टरने काही प्रश्न विचारून दमदाटी केली आणि मग शेतकऱ्याला खडसावले आणि रिपोर्ट न लिहिता हुसकावून लावले.
शेतकरी खिन्न होऊन निघू लागला तेवढ्यात मागून एक शिपाई धावत आला आणि म्हणू लागला, “चहा-पाण्याची व्यवस्था कराल, तर रिपोर्ट लिहू.”
बरीच घासाघीस केल्यानंतर हवालदाराने ३५ रुपयांत एफआयआर लिहून घेण्यास होकार दिला. त्यावेळी ही चांगली रक्कम मानली जात होती. रिपोर्ट लिहून झाल्यावर इन्स्पेक्टरने त्या गरीब शेतकऱ्याला विचारले, “बाबा अंगठा देणार की सही करणार?”
शेतकऱ्याने सही करेन असे सांगितल्यावर इन्स्पेक्टरने कागद आणि पेन पुढे केलं. शेतकऱ्याने पेनासोबत शाईचे पॅड उचलले तेव्हा इन्स्पेक्टर विचारात पडला.
तो म्हणाला, “सही करणार ना? मग शाईचे पॅड का उचलताय?”
फोटो व माहिती सोशल मीडियावरून साभार
भारताचे पंतप्रधान चरणसिंग चौधरी
शेतकऱ्याने शांतपणे सही केली आणि खाली आपले नाव लिहिले, “चौधरी चरणसिंग”! त्याच वेळी त्याने कुर्त्यातून एक शिक्का काढला व कागदावर सहीच्या बाजूला मारला ज्यावर लिहिले होते, “पंतप्रधान, भारत सरकार”!
हा प्रकार पाहून पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
चौधरी चरणसिंग त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते आणि स्थानिकांच्या तक्रारीवरून ते अचानक पोलिस स्टेशनची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी आपला ताफा खूप दूर थांबवला होता आणि कुर्ता फाडून आणि कुणालाही शंका येऊ नये म्हणून अंगाला थोडीशी माती लावून त्यांनी पोलीस ठाणे गाठले होते.
AI फोटो काल्पनिक साभार
उत्तर प्रदेश मधील इटावा जिल्ह्यातील ऊसरहर संपुर्ण पोलीस स्टेशन मधील कर्मचारी निलंबित
“त्या दिवशी इटावाचं संपूर्ण उसरहर पोलीस स्टेशन निलंबित करण्यात आलं होतं.”
भ्रष्टाचार आणि लोकशाहीवरील विश्वास:
“भ्रष्टाचार कमी होऊन लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढावा यासाठी आजच्या नेत्यांनी या घटनेतून धडा घेण्याची गरज आहे.”