रिक्षा चालकांच्या विविध मागण्यासाठी पुणे जिल्ह्यातील संघटना यांनी एकत्र येत घेतली परिवहन आयुक्त महाराष्ट्र यांची भेट
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी मुंबई

रिक्षा चालकांच्या विविध मागण्यासाठी पुणे जिल्ह्यातील संघटना यांनी एकत्र येत घेतली परिवहन आयुक्त महाराष्ट्र यांची भेट
काही दिवसांपूर्वी रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली होती. रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले होते की,रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्याचा बाबत शासन सकारात्मक असून त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकर स्थापन केले जाईल.
यासाठी शासन आणि संघटनेच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसात गठित करून त्या मार्फत कल्याणकारी मंडळाचे कामकाज तसेच, रिक्षा चाल मालकांसाठी राबवायच्या विविध योजनांची आखणी केली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी रिक्षा चालक-मालकांच्या विविध संघटना समवेत झालेल्या बैठकीत जाहीर केले होते.
त्या अनुषंगाने पुणे जिल्हा चालक-मालक कृती समिती यांनी आज दिनांक 26 11 2024 रोजी रिक्षा चालकांच्या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांची मुंबई येथे पुणे शहर जिल्हा चालक-मालक संघटना कृती समिती यांच्या वतीने भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी चर्चेत प्रमुख असलेले मुद्दे रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ अंमलबजावणी करणे, एग्रीकेटर पॉलिसी ची त्वरित अंमलबजावणी करणे, उबेर कंपनी रिक्षा चालकांना देत असलेल्या कमी दराबाबत उबेर कंपनीला नोटीस बजावणी, आरटीओ मधील रिक्षा चालकांच्या सर्व सेवा ऑनलाइन करणे, डायरेक्ट मीटर पासिंग करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, रिक्षा परमिट बंद करणे, ई रिक्षाला परमिटची सक्ती करणे, बजाज फायनान्स वर रिक्षा चालकांच्या बेकायदेशीर रिक्षा जप्त केले प्रकरणी नोटीस बजावने, या सर्व मुद्द्यांवर रिक्षा संघटनांनी परिवहन आयुक्तांचे लक्ष वेधले यावेळी आम आदमी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आनंद अंकुश खजिनदार केदार ढमाले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, जनता गॅरेज रिक्षा संघटनेचे सचिन वैराट, रमेश तोरडमल, समर्थ रिक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे, परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वरील प्रमाणे काही प्रमुख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन रिक्षा चालक-मालक च्या विविध मागण्याची निवेदन दिले