शिरूरमधील महावितरणचे दत्तात्रय शिर्के गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित!
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा
शिरूरमधील महावितरणचे दत्तात्रय शिर्के गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित..!!
शिरूर: शिरूर शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथे कार्यरत असलेले तंत्रज्ञ दत्तात्रय अशोक शिर्के यांना त्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक कार्याबद्दल गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने गौरवण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य साधून बारामती परिमंडलाचे मुख्याधिकारी धर्मराज पटेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बारामती परिमंडल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दत्तात्रय शिर्के यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शिरूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव आणि सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाची दखल घेत हा पुरस्कार मिळाल्याचे दत्तात्रय शिर्के यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचेही आभार मानले.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी महावितरणचे कर्मचारी लगड, कनिष्ठ लिपिक शिंदे, प्रणव भोईर, सागर नवले, निशा ढाकणे लोहार मॅडम, सुमित आहीरे, नेवसे, निलेश आगलावे, अशोक गुळादे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. दत्तात्रय शिर्के यांच्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.