फिल्मी दुनिया
Trending

“छावा ” ने बॉक्स ऑफिस वर इतिहास रचला, चित्रपटान २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले, बॉक्स ऑफिसवर “छावा”चीच हवा..!!

निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

“छावा ” ने बॉक्स ऑफिस वर इतिहास रचला, चित्रपटान २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले, बॉक्स ऑफिसवर “छावा”चीच हवा..!

विकी कौशल चा अभिनय असलेल्या “छावा” चित्रपटांन थिएटर मध्ये रिलीज होतात धुमाकूळ घातला आहे, या चित्रपटाला न केवळ क्रिटिक्स कडून शानदार रिव्यू मिळाला, तर हा चित्रपट पहिल्या दिवशी थिएटरमध्ये जाऊन पाहणाऱ्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरत, सोशल मीडियावरही कौतुकाचा पाऊस पाडला आहे.छावा चित्रपटामध्ये विक्की कौशलन “छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, “छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे”.! तर रश्मिका मंदानान महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने मुगल बादशाह औरंगजेब रुपेरी पडद्यावर साकारला आहे. सर्व कलाकारांनी भूमिका जिवंत करण्यासाठी जीव ओतल्याचे पहावयास मिळत आहे, अशी प्रतीक्रिया चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत. अनेकांनी अभिनेत्यांचा दमदार अभिनय इतका खरा वाटतो की, अंगावर शहारे उभे राहतात.! असे अनेक प्रेक्षकांनी म्हटले आहे. 

 

छावा”चित्रपटांन वर्षातील सर्वात मोठ्या ओपनरचा विक्रम ही केला आहे. सेकनिल्क च्या अंदाजानुसार “छावा” चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे ११ कोटी रुपयांनी ओपनिंग केली आहे.

या चित्रपटाची कथा ऐतिहासिक असल्यामुळे चित्रपट जोरदार गर्दी खेचताना दिसत आहे. हा चित्रपट १७ व्या शतकातील “मराठा साम्राज्य आणि मुगल” यांच्यातील संघर्ष दर्शवतो. या चित्रपटाचे प्रेक्षक वर्गाकडून खूप कौतुक होत आहे. “छावा”चित्रपटाचा वाढता प्रेक्षक वर्ग पाहता असे दिसते की, २०२५ सालचा हिट चित्रपट नक्कीच असू शकतो. प्रेक्षकांमध्ये “छावा”ची क्रेझ पाहिला मिळत आहे.

“छावा”हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, मराठा साम्राज्याच्या शौर्याची गाथा जगासमोर मांडणारा एक महत्त्वाचा सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या चित्रपटात द्वारे केले जात आहे. ऐतिहासिक चित्रपटाची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. “छावा”ने इमर्जन्सी, आझाद, स्काय फोर्स,देवा या काही चित्रपटांचे पहिल्या दिवसाच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये