शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा देशमुख, सूर्यवंशी हत्तेचा निषेध
निर्भय न्यूज लाईव्ह:शिरूर प्रतिनिधी

शिरूर : शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून व हुतात्मा स्मारकाला पुष्प हार घालून, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना सकल मराठ समाज व सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सामाजिक संघटना या सर्व संघटनांनी सामुहीक आदरांजली वाहिली.
शिरुचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मेणबत्ती हातात धरून निषेध नोंदवण्यात आला. या प्रकरणात जे कोण आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. या दोन्ही मारेकरी यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या वेळी बाबुराव पांचगे ,रविंद्र सानप, संजय बारवकर, अनिल बांडे, महिबुब सय्यद, राजेंद्र क्षीरसागर, सतीश धुमाळ, प्रकाश बाफणा, निलेश जाधव, सुरज पांचगे, कुणाल काळे, रावसाहेब चक्रे, सागर नरवडे, अमोल चव्हाण, प्रकाश थोरात, वर्षा काळे, वैशाली गायकवाड, बंटी जोगदंड, शामकांत वर्पे, योगेश महाजन, शंकर चाबुकस्वार, दादासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सुनील जाधव, स्वप्निल रेड्डी, रूपेश घाटगे, अविनाश घोगरे, महेंद्र यवले, अविनाश जाधव, यांनी केले .