छाताडावर बंदूक ठेवून,शिरूर मध्ये व्यापाऱ्यावर गोळीबार.. ! व्यापारी थोडक्यात बचावला..फिल्मी स्टाईल थरार..एकाला अटक.काय घडलं…!
निर्भय न्यूज लाईव्ह:शिरूर प्रतिनिधी

छाताडावर बंदूक ठेवून,शिरूर मध्ये व्यापाऱ्यावर गोळीबार.. ! व्यापारी थोडक्यात बचावला..फिल्मी स्टाईल थरार..एकाला अटक.काय घडलं..
पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत असतानाच,आता शिरूर मध्ये देखील गोळीबार झालेली धक्कादायक घटना समोर आली आहे.
•गोळीबार घटनेने शिरूर मध्ये माजली खळबळ•
शिरूर मध्ये झालेल्या या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
४ वर्षांपूर्वी इन्कम टॅक्स विभागाकडे अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने, हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.किरकोळ वादातून घडलेले या घटनेमुळे परिसरात दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
•पूर्व वैमान्यासातून काय घडले•
या प्रकरनी महेंद्र मोतीलाल बोरा (वय – ५३धंदा-किराणा दुकान राहणार, सरदार पेठ, शिरूर,जि-पुणे यांनी )शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२१ जानेवारी रोजी रात्री ,सरदार पेठ,शिरूर येथे ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिरूर शहरातील सरदार पेठ, येथे फिर्यादी यांचे स्वीटी प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणून किराणा दुकान आहे. हलवाई चौक ते मारुती आळी रस्त्यावरच आरोपी राहण्यास आहे.फिर्यादी महेंद्र बोरा यांनी आरोपीविरुद्ध चार वर्षापूर्वी इन्कम टॅक्स कडे अर्ज केल्याचा व आरोपी कृष्णा वैभव जोशी यांच्या लग्नात अडथळे निर्माण करत असल्याचा गैरसमज आरोपीला झाला होता.
या गैरसमजातून आरोपी कृष्णा वैभव जोशी राहणार, सरदार पेठ. शिरूर.जि. पुणे याने मद्यपान करून फिर्यादीच्या दुकानाजवळ येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
•शिवीगाळ करत झटापटीत गोळीबार•
शिवीगाळ केल्यानंतर आरोपीने स्वतः जवळ असलेले पिस्तूल बाहेर काढले आणि “मी तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत पिस्तुलाचा खटका दाबला. प्रसंगावधान राखत फिर्यादीने आरोपीचा हात बाजूला करून त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.या झटापटी दरम्यान रस्त्यावर गोळी झाडली गेली.
सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. गोळीबार नंतर आरोपीने फिर्यादीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून फळ काढला.
याप्रकरणी कृष्णा वैभव जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री संदेश केंजळे सो, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली,पुढील तपास पोसई चव्हाण हे करत आहे .