शिरूरमधील प्रसिद्ध उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्त्व स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराने नवा विक्रम प्रस्थापित केला. या शिबिरात तब्बल 1242 रक्तदात्यांचा सहभाग
Nirbhay news live:vrutt seva

शिरूरमध्ये रसिकलाल धारिवाल यांच्या जयंतीनिमित्त विक्रमी रक्तदान शिबिर; 1242 रक्तदात्यांचा सहभाग
शिरूर (प्रतिनिधी): शिरूरमधील प्रसिद्ध उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्त्व स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिराने नवा विक्रम प्रस्थापित केला. या शिबिरात तब्बल 1242 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
हे रक्तदान शिबिर प्रकाशभाऊ धारिवाल मित्रमंडळ शिरूर व पंचक्रोशी आणि पुणे येथील केईम ब्लड बँक, शिरूर येथील ओम ब्लड बँक, अहिल्यानगर येथील आनंद ऋषी ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक आणि भोसरी (पुणे) येथील संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर मागील सात वर्षांपासून आयोजित केले जात आहे.
शिबिराचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल, ‘नाते रक्ताचे’चे राम बांगर आणि माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि स्वर्गीय रसिकलाल धारिवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, राम बांगर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी नगरसेवक विजय दुगड, माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण, गोडाजी पार्श्वनाथ ट्रस्टचे विश्वस्त सतीश धाडीवाल, रमेश कर्नावट, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, रक्तदान शिबिराचे आयोजक प्रशांत शिंदे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, तुकाराम खोले, संघपती भरत चोरडिया, शरद कालेवार, योगेश जामदार, संजय देशमुख,आम आदमी पार्टीचे अनिल डांगे, विनोद भालेराव, किरण बनकर, संतोष शितोळे, सागर नरवडे, निलेश जाधव, सुशांत कुटे, संजय देशमुख, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, राजेंद्र गावडे, आशिष नहार, एजाज बागवान, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, उद्योजक धरमचंद फुलफगर, शिवसेवा मंडळाचे सचिव मनसुख गुगळे, माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, आदर्श सरपंच अरुणराव घावटे, श्रीनिवास परदेशी, प्रभाकर ढेरे, ॲड. विलास करंजुले, आर.एम.डी. धारिवाल स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु, रंजन झांबरे, सरपंच विठ्ठल घावटे, अविनाश जाधव, सुनील जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते स्वप्नील गायकवाड, महेश ढमढेरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि प्रकाशभाऊ धारिवाल मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार अशोक पवार म्हणाले, “रसिकलाल धारिवाल यांनी आपल्या अथक परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी नेहमीच समाजातील गरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात दिला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेमुळेच आज हे विक्रमी रक्तदान शिबिर यशस्वी झाले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, अशा सामाजिक उपक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळतो.”
मनसे नेते बाबू वागस्कर यांनी धारिवाल कुटुंबीयांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “शिरूर शहराला खऱ्या अर्थाने नावारूपाला आणण्याचे काम धारिवाल कुटुंबीयांनी केले आहे. रसिकलाल धारिवाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या निधनानंतर प्रकाशभाऊ आणि आदित्य यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळत आहे. या शिबिराला मी सात-आठ वर्षांपासून हजर असतो.”