
शिरूर शहर बंद अखेर मिटला..
काल रविवार दिनांक ०२/११/२०२४ रोजी शिरूर शहरातील राम आळी मधील श्रीराम मंदिरामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मांसाहारी अन्न खाऊन त्या ठिकाणी तसेच टाकून दिले. सदर घटना काही श्रीराम भक्तांच्या निदर्शनास आली आणि शिरूर शहरांमध्ये त्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यामध्ये सकल हिंदू समाज, तसेच बजरंग सेना, लहुजी सेना, श्रीराम सेना या संघटनांचा कार्यकर्त्यांनी ताबडतोब या गोष्टीचा निषेध करून; शिरूर शहर बंदची हाक दिली.
शिरूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले ही बातमी उशिरा रात्री शिरूर हवेली चे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना दूरध्वनी वरून समजली दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज माऊली आबांचा शिरूर शहर व पंचक्रोशी मध्ये आभाराचा दौरा होता.!तो त्वरित रद्द करून माऊली आबा तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरांमध्ये आले व शहरातील कार्यकर्त्यांना राम मंदिरात भेट देऊन त्या ठिकाणी बंदची हाक देणाऱ्या कार्यकर्त्यांना व तसेच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी शिरूर शहरात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची विनंती केली व जे कोणी ही निंदनीय गोष्ट केली आहे त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
अशा सूचना आमदारांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आणि आमदारांच्या आव्हानाला संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अखेर बंद मिटवण्यात आला व स्वतः सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आमदार माऊली आबा कटके यांनी शिरूरच्या बाजारपेठेत फिरून सर्व व्यापारी वर्गाला त्या ठिकाणी आप- आपली दुकाने उघडण्यास सांगितले.
आमदार माऊली आबा कटके यांनी सदर गोष्टीची तातडीने दखल घेतल्यामुळे व शिरूर शहरातील आमदारांच्या आव्हानामुळे तणावाचे वातावरण काही तासात निवळले व व्यापारी वर्गात व शिरूर शहरात सर्व नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त करून आमदारांना धन्यवाद दिले व समाधान व्यक्त केले.
प्रभू श्री राम मंदिरात घडलेल्या अनुचित प्रकरणातील अज्ञात व्यक्तींवर आणि कठोर कारवाई करणेबाबत आणि मंदिर प्रशासनाला योग्य त्या सूचना करणेबाबत. व येणाऱ्या काळात मंदिर जिर्णोद्धाराचा पाठपुरावा करावा यासाठी शिरूर-हवेली चे आमदार माऊली आबा कटके यांना बजरंग सेनेच्या वतीने निवेदन दिले..!