शिरूर नगरपालिका शाळेचा विद्यार्थी तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर नगरपालिका शाळेचा विद्यार्थी तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय
शिरूर: अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आरुष अमोल चव्हाण याने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
आरुषच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका उषा वेताळ, वर्गशिक्षिका प्रमिला तळेकर आणि शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले. आरुषला सौ. संपदा राठोड आणि सौ. प्रतिभा आहेर यांनी मार्गदर्शन केले.
आरुषला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर विद्यार्थ्यांनाही सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आरुषच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.