पोलिसांच्या खुनातील ११ वर्षांपासूनचा फरार आरोपी पुण्यात जेरबंद; फरार झाल्यावर केले दोन विवाह!
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

पोलिसांच्या खुनातील ११ वर्षांपासूनचा फरार आरोपी पुण्यात जेरबंद; फरार झाल्यावर केले दोन विवाह
पुणे: कर्नाटकात पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून ११ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, तो हडपसर भागातील फुरसुंगी येथे लपून बसला होता. विशेष म्हणजे, फरार झाल्यानंतर त्याने दोन विवाह केले होते.
पोलिसांना चकवा देत बदलले नाव:
* २००९ मध्ये अमरीशने एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून केला होता.
* त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
* उपचारासाठी विजापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता, तो पळून गेला.
* त्याने राहुल कांबळे आणि राजू काळे या नावाने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवले होते.
* तो रिक्षा चालक आणि मजुरी काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.
कर्नाटक पोलिसांच्या मदतीने कारवाई:
* फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून अमरीशची माहिती मिळवली.
* गुलबर्गा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक केली.
* अमरीशने फरार झाल्यावर सोलापूर येथे दोन विवाह केले होते.
* त्याच्या दोन पत्नी सोलापूरमध्ये, तर एक पत्नी गुलबर्गा येथे राहते.
पोलिसांची कामगिरी:
परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे, हवालदार महेश उबाळे, सुनील कांबळे, वैभव भोसले यांनी ही कामगिरी केली.