रिक्षा चालकांसाठी आनंदाची बातमी पुणे आरटीओ कार्यालयात रिक्षा चालकांसाठी कक्ष स्थापन
निर्भय न्यूज लाईव्ह-प्रतिनिधी

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ सुरू करण्याची घोषणा काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानुसार कामास सुरुवात झाली असून पुणे आरटीओ कार्यालयात याकरिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात गेली दोन दिवसात एकूण ४९ व अधिक जणांनी अर्ज भरले.
रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे,याकरिता राज्यासह पुणे शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी जोरदार आंदोलने केली होती. गेले अनेक वर्षांची रिक्षा चालकांची मागणी पूर्ण झाली असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काही दिवसापूर्वी केली आहे त्यानुसार कामकाज सुरू झाले असून याचा रिक्षा चालकांना भविष्यात फायदा होणार आहे रिक्षा चालकांसाठी कल्याणकर मंडळ स्थापन व्हावे याकरिता याकरिता अनेक रिक्षा संघटनांनी अनेक दिवस आंदोलन केले होते त्यांचाच आंदोलनाचा फायदा आज रिक्षा चालकांना होत आहे.
¶¶१९ वर्षानंतर मागणी पूर्ण¶¶
२००५ सालापासून प्रलंबित असलेली रिक्षा चालकाची मागणी अखेर पूर्ण झाली.
रिक्षा चालकाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे तब्बल १९ वर्षाच्या कालावधीनंतर आता रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली जात आहे
¶¶मंडळांतर्गत या सुविधा मिळणार¶¶
मंडळाच्या स्थापनेसाठी शासनाकडून ५० कोटीची तरतूद जीवन विमा,अपंगत्व विमा योजना,आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (५०हजार रुपयापर्यंत) पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, महाराष्ट्र कामगार कौशल्य योजना इत्यादी