महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस व सीमा सुरक्षा दलाचे जवानांकडून सशस्त्र पथ संचलन
निर्भय न्यूज प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरामध्ये आज शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश जी केंजळे यांचा नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातून विधानसभा निवडणूक च्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन व भारतीय पोलीस सेवा दलाचे जवान यांनी शिरूर मधील विविध भागातून पथसंचलन केले.
शिरूर शहरातून २५/१०/२४ रोजी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख, भारतीय पोलीस सेवा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो, पुणे विभाग श्री रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सो, शिरूर उपविभाग श्री प्रशांत ढोले. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांनी त्यांच्याकडील ४ अधिकारी व ३० अंमलदार तसेच सीमा सुरक्षा दलाकडील ५ अधिकारी व ७०जवान असे सशस्त्रासह शिरूर पोलीस स्टेशन पासून शिरूर शहरातील बी.जे.कॉर्नर, राम माळी, पाच कंदील चौक, डंबे नाला,आण्णाभाऊ साठे चौक, शिरूर बस स्टॅन्ड, इंदिरा गांधी पुतळा, बी.जे कॉर्नर असे पथ संचलन करण्यात आलेले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होणारे प्रचार, मतदान, मतमोजणी इत्यादी प्रक्रिया करिता पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदरचे पथसंचलन करण्यात आलेले आहे.