शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक
निर्भय न्यूज लाईव्ह-कारेगाव प्रतिनिधी

कारेगाव- करडे रोड ता. शिरूर येथे सराईत गुन्हेगाराला पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक
शिरूर तालुक्यातील कारेगाव-करडे रस्त्यावरील भूत बंगला येथे अवैध रित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार तरुणांना रांजणगाव पोलीस पथकाचे अटक , असून त्याच्याकडून १ पिस्टल व १ जिवंत काडतुस असा ३५,२०० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. सुशांत रमेश कराळे, वय २७ वर्ष बाबूळसर खुर्द ता. शिरूर,पुणे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती पुढील प्रमाणे दिनांक २५ ऑक्टोबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, कारेगाव – करडे रोड लगतच्या भूत बंगल्याजवळ चॉकलेट रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याचे समजले पोलीस निरीक्षण वाघमोडे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात,सहाय्यक फौजदार दत्तात्रय , पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर यांचे सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले.
माहितीच्या आधारे भूत बंगल्याजवळ पोलीस पथकाने सापळा लावला असता दुपारी सव्वा बारा दरम्यान चॉकलेट रंगाचे शर्ट घातलेला तरुण तिथे येतात पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याला अटक केली, त्यांची अंग झडती घेतली असता , त्यांकडे एक पिस्टल व एक जिवंत काडतूस असा ३५ हजार २०० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.त्याचे नाव सुशांत कराळे असून तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून यापूर्वी खुणाचा व आर्मॲक्ट चा गुन्हा दाखल असून त्याच्या विरोधात तडीपारीचा ही प्रस्ताव प्रलंबित असून लवकरच त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधिकार रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण महादेव , सहाय्यक फौजदार अविनाश , सहाय्यक फौजदार दत्तात्रय , पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी . आरोपी ने सदरचे पिस्टल कोणाकडून आणले आहे व त्याचा पिस्टल बाळगण्याचा नेमका काय उद्देश आहे याबाबत तपास सुरू असून, गुन्ह्यांचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार अभिमान कोळेकर करीत आहे.
सुशांत कराळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून यापूर्वी खुनाचा व आर्म अॅक्ट गुन्हा दाखल असून त्याचा विरोधी तडीपारीचाही प्रस्ताव प्रलंबित असून लवकरच त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.