नागरी सुविधांचा पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरा मध्ये बोजवारा.. न.प.अधिकारी क्रीडा स्पर्धेमध्ये मग्न..!!
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्त सेवा

नागरी सुविधांचा शिरूर मध्ये बोजवारा.. न.पा.अधिकारी क्रीडा स्पर्धेमध्ये मग्न..!
वाढत्या व्यापारामुळे शिरूर शहरात मोठ – मोठ्या बँका, मॉल येत आहेत. एकंदरीत शिरूर शहर विकसित होत असल्याचे चित्र आहे.पण वरवरच.कारण दुसरीकडे शिरूर शहरात नागरी सुविधांच्या बाबतीत ठराविक बाजार पेठा सोडल्या तर इतर भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला दिसतो.ज्या वस्तीच्या पुढे अमुक — तमुक नगर लावलेले दिसते त्या (स्लम एरिया)ठिकाणचे नागरिक अडचणीचे जीवन जगत आहेत.असे वर्षानुवर्ष शिरूर शहरातील चित्र आहे.
मंगल मूर्तीनगर मधील नागरी सुविधां अभावी नागरिकांचे होत आहेत प्रचंड हाल..!
ड्रेनेजे लाईन तुंबने मंगलमूर्ती नगर मध्ये नित्याचेच.या भागात गेल्या महिनाभरा पासून सातत्याने ड्रेनेज लाईन तुंबत आहे त्यामुळे मंगलमूर्ती नगर मधील मुख्य रस्त्याला वेळोवेळी नाल्याचे स्वरूप आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मंगलमूर्ती नगर मधील अनेक नागरिकांची बैठी घरे आहेत त्यामुळे लाईन तुंबल्याने घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते.ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे नागरिकांचे आरोग्य अनेक वेळा धोक्यात आले असून याच्यावर प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. मंगलमूर्ती नगरला एकच मुख्य रस्ता आहे तोही प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे अर्धवट झाला आहे, अर्धवट अपूर्ण आहे त्यातच रस्त्यावर अतिक्रमण वाढत चालले आहे त्याचे प्रशासनाला काही घेणे देणे नाही प्रशासनाधिकारी आपल्या एसी ऑफिस मध्ये बसून खुर्च्या ऊबवायचे काम करत आहे.पावसाळ्यामध्ये मंगलमुर्ती नगरचे रस्त्याला साधी चालता येत नाही. . घंटागाडी कधीही वेळेत नाही,दोन दोन दिवसाच्या फरकाने येथे त्यामुळे मंगलमूर्ती परिसरामध्ये अनेक ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेवर उघड्यावर कचरा टाकल्यामुळे कचराचे ढीग दिसत आहेत.आरोग्य,रस्ते,ड्रेनेज लाईन ची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चाललेली आहे. इलेक्शन काळात सुविधांच्या नावाखाली आम्हाला केवळ मिळतात आश्वासन.!! मंगलमूर्ती नगर मधील नागरिक आपल्या व्यथा सांगताना खूप व्याकुळ झालेले होते.
शहरातील एकच मुख्य रस्ता तोही धड नाही..!
सध्या रस्ते विकासाची मोहीम सुरू असली तरी ती कासवाच्या गतीने पुढे सरकत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यावरील डस्ट, खडी, ठिकठिकाणी खड्डे, रात्रीचा अंधार यामुळे वाहनधारक व नागरिक बेजार झाले आहे. बस स्टॅन्ड, विद्याधाम प्रशालेचा परिसर सिटी बोरा कॉलेज रोड, या परिसरात वाहतुकीची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगलमूर्ती नगर ,प्रीतम प्रकाश नगर यांच्यासमोर गतिरोधक नाही.!
मंगलमूर्ती नगर आणि प्रीतम प्रकाश नगर पासून काही हाकेच्या अंतरावरती मुख्य अहिल्यानगर पुणे हायवे असल्यामुळे त्या हायवे वरून येणारी वाहने तितक्याच वेगात शिरूर शहरात येतात त्यांचा वेग कमी होण्यासाठी गतिरोधक बसवणे आवश्यक आहे मंगलमूर्ती नगर मधील मुख्य रस्ता काहीसा चढाचा व प्रीतम प्रकाश नगर मधील रस्त्याला उतार असल्यामुळे वाहने व नागरिकांना हाय वे वरून येणाऱ्या वाहनाच्या वेगाचा रस्ता ओलांडताना अंदाज न आल्याने अनेक नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे,काही प्रसंगी अपंगत्व व जीवितास हानी ही झालेली आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून योग्य अशा उपयोजना कराव्यात अशी मागणी सध्या या परिसरातून जोर धरत आहे.
शिरूर नगरपरिषद हद्दीत अतिक्रमनामध्ये दिवसेंदिवस वाढ..
शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमणामध्ये वाढ होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.सजग नागरिकांनी तक्रार करून ही प्रशासन कारवाई साठी टोलवा – टोलवी करून अधिकारी आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात.काही कर्मचारी आर्थिक तडजोडी करून अतिक्रमणांना पाठबळ देत असल्याची चर्चा आहे.
परप्रांतीय व्यापाऱ्यांनि स्थानिकांना हाताशी धरून कोठेही व्यापार करण्याची मुभा नगर प्रशासनाने दिली काय.? अशी सजग नागरिकांमध्ये चर्चा आहे. या सर्व कारणामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी आहे.!
शिरूर शहरांमध्ये पार्किंगचा खेळ खंडोबा..!
शिरूर शहरांमध्ये पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. विशेषतः पाच कंदील चौकातील कापड बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही अधिकृत पार्किंग ची सोय नसल्यामुळे व स्थानिक व्यापारी आपली वाहने रस्त्यावरच लावत असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.
मालमत्ता व पाणीपट्टी करा साठी सर्वसामान्य थकबाकीदारकावर कारवाईचा बडगा उगारनारे प्रशासन नागरी सुविधा कधी देणार..?
थकबाकीधारकांना कर संकलन विभागाच्या वतीने चार वेळा फोन करणारी नगरपालिका, एक वेळेस कचरा वेळेवर उचलला न गेला तरी चालेल पण, कर संकलनासाठी दहा घंटा गाडीच्या माध्यमातून रीतसर दवंडी देणारी नगरपालिका प्रशासन ..!!
या सर्व प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणार का..? पहिले पाढे ५५ याप्रमाणे वागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे…!!!