रांजणगाव MIDC, [२३ जून २५]: रांजणगाव एमआयडीसी परिसरातील जाबिल स्टील कंपनीच्या स्टोअरमध्ये एका व्यक्तीला हेल्मेट का घातले, या क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विजय काशीराम बारसकर (वय ५३, रा. लांडेवस्ती, रांजणगाव, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकी जाधव (रा. कारेगाव, ता. शिरूर) याच्याविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विजय बारसकर हे रांजणगाव एमआयडीसी येथील जाबिल स्टील कंपनीच्या स्टोअरमध्ये असताना, आरोपी विकी जाधव तेथे आला. त्याने बारसकर यांना “हेल्मेट का घेतले?” असे विचारले. यानंतर जाधवने आपल्या हातातील लोखंडी रॉडने बारसकर यांना मारहाण केली. या हल्ल्यात बारसकर जखमी झाले असून, आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर विजय बारसकर यांनी २२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) (३) अंतर्गत गुन्हा क्रमांक २०५/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात फिर्यादी स्वतः जखमी झाले असून, मारहाणीसाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सरजिने (पो. हवा./१६३१) करत आहेत. पुढील तपास सुरू असून, आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.