ग्रामीण वार्ता
Trending

शिरूर पोलिसांकडून कवठे – येमाई परिसरातील गावठी हातभट्टी निर्मितीवर मोठी कारवाई; रु. १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूर (पुणे): शिरूर पोलिसांनी गावठी हातभट्टी निर्मितीवर मोठी कारवाई करत रु. १,१३,७७५/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सागर गणपत गडगुळ (रा. कवठेयमाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २५/०६/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पो.हवा. सुद्रिक, पो.हवा. सांगळे आणि पो.हवा. भवर यांच्या पथकाने मौजे कवठे यमाई गावच्या हद्दीत, ता. शिरूर, जि. पुणे येथे अचानक छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ३,२०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे व जळके रसायन, हातभट्टीची दारू, केमिकलयुक्त ताडी आणि इतर साधने असा एकूण १,१३,७७५/- रुपये किमतीचा माल जप्त करून जागेवरच नष्ट केला. जप्त केलेल्या मालामध्ये १,१२,०००/- रुपयांचे २० लिटर मापाचे १५ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे बॅरल (ज्यामध्ये प्रत्येकी २०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन – एकूण ३००० लिटर आंबट गुळमिश्रित वासाचे रसायन), चुलीवरील लोखंडी बॅरलमधील २०० लिटर जळके रसायन (एकूण ३२०० लिटर कच्चे व जळके रसायन), १,०००/- रुपयांची भट्टी चालू असलेले लोखंडी इम वरील ॲल्युमिनियमचे घमेले, ५००/- रुपयांची ५ लिटर मापाच्या कॅनमधील ५ लिटर हातभट्टीची दारू, १७५/- रुपयांची ५ लिटर मापाच्या कॅनमधील ५ लिटर केमिकलयुक्त ताडी आणि १००/- रुपयांचा ॲल्युमिनियमचा चाटू यांचा समावेश आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४८/२०२५, भा.न्या.स. कलम १२३ सह महा.प्रो.का.क. ६५ (क) (फ) प्रमाणे दिनांक २५/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बी. के. भवर (पोलीस हवालदार ब.नं. २३३६, नेमणूक शिरूर पोलीस ठाणे, जि. पुणे ग्रामीण) यांनी सागर गणपत गडगुळ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी कवठेयमाई गावचे हद्दीत, बाबाजी बागदरे व राज गडगुळ यांच्या शेताजवळ ओढ्याच्या कडेला, ता. शिरूर, जि. पुणे येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन आणि तीन दगडांवरील चुलीवर लोखंडी इम ठेवून जाळ घालून गावठी हातभट्टीची दारू तयार करत होता. तसेच तयार हातभट्टीची दारू आणि मानवी आरोग्यास अपायकारक व हानिकारक असलेली केमिकलयुक्त ताडी विक्रीसाठी बाळगली होती. पोलीस पथक आणि पंचांची चाहूल लागताच आरोपी उसाच्या शेतात पळून गेला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण श्री. संदीपसिंह गिल (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग श्री. प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुद्रिक, पोलीस हवालदार सांगळे व पोलीस हवालदार भवर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वारे (ब.नं. ८५०) करत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. केंजळे सो. हे आहेत.

शिरूर पोलीस प्रशासनाने गावठी हातभट्टीसारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना स्पष्ट आवाहन केले आहे की, त्यांनी त्वरित हे बेकायदेशीर उद्योग बंद करून कायद्याचा आदर करावा, अन्यथा पोलीस प्रशासन कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये