देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या..
निर्भय न्यूज लाईव्ह:देहू वृत्त सेवा

देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थि विवंचनेतून आत्महत्या करण्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोकळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी ८:३० च्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. शिरीष महाराज यांचा २० फेब्रुवारी २५ ला विवाह होणार होता.
श्री शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते आराम करत होते. मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी ८:३० वाजले तरी ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातले सदस्य वरती गेले. दरवाजा वाजविला पण दार उघडले जात नव्हते. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडण्यात आले. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचनेचे आत्महत्या केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. अधिक अधिक देहूरोड पोलीस करित आहेत. दरम्यान, ह.भ.प शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिववर वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्री महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उललेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. २० फेब्रुवारी रोजी मोरे विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलिस करत आहेत.